राष्ट्रवादी नेते अनिल देसाई यांनी घेतली उत्तमराव जानकर यांची भेट

675
Adv

माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी उत्तमराव जानकर यांची भेट घेतल्याने माढा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय ट्विस्ट झाला आहे

उत्तमराव जानकर यांनी तीन दिवसांपूर्वीच सांगितले होते की मोहिते पाटील हे आमच्यापासून लांब नाहीत खास विमानाने खासदार निंबाळकर यांनी जानकर यांना नागपूर दर्शन घडवून आणले यानंतर ते काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मात्र जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला कायमच राजकीय दृष्ट्या फसवले गेले आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी केल्याने जानकर यांनी आता सावध भूमिका घेतली आहे उत्तमराव जानकर यांच्या घरी राष्ट्रवादीचे नेते अनिल देसाई यांनी भेट घेतल्याने माढा मतदार संघात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे

माढा लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस राजकीय ट्विस्ट बघायला मिळत असून माढा येथील नागरिकांचा भाजपला नाही तर खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे खासदार निंबाळकर यांच्यावरचा राजकीय विरोध दिवसेंदिवस वाढू लागल्याने माढा लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागणार असे काही तेथील जाणकारांचे म्हणणे आहे

Adv