खासदार निंबाळकर उपमुख्यमंत्री यांच्या भेटीला

660
Adv

माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे तिकीट जाहीर होऊन तब्बल एक महिना झाला तरी यांना मतदारसंघातील नेत्यांची मनधरणी करताना सध्या तरी दिसून येत आहे आज सकाळी माढा लोकसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर यांना खास विमानाने घेऊन थेट नागपुरात दाखल व्हावे लागत आहे

माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने तगडे आव्हान निर्माण झाले आहे खासदार निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होऊन तब्बल एक महिना झाला एक महिना नंतरही खासदार निंबाळकर यांना आपल्या मताचे गणित जुळवण्यासाठी मान्यवर नेत्यांची जुळवाजुळ करताना दमछाक होत असल्याचे दिसून येते

खासदार निंबाळकर यांनी विकास कामाचा धडाका लावला असता तर माढा लोकसभा मतदारसंघातील मान्यवर नेत्यांच्या मागे फिरण्याची वेळ आली नसती यावरून माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार हे जवळपास आता निश्चित झाले असल्याची चर्चा माढा लोकसभा मतदारसंघात रंगू लागली आहे

Adv