गोंदवले बुद्रुक येथे चैतन्य कोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या फ्लेक्स वरून माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांचे फोटो गायब असून प्रोटोकॉल म्हणून फक्त नावाचा उल्लेख केला असल्याचे दिसून येते यावरून कोरोना काळातही ही राजकारण असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगू लागली आहे
खटाव माण तालुक्यातील वाढती कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन माजी आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी नविन कोरोना सेंटर सुरू होणार असून या कोरोनाच्या काळात सुज्ञ लोकांनी तरी राजकारण करू नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत
विशेष म्हणजे पडळ कारखान्यावरील खून प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा फोटो मात्र वरच्या स्थानी असल्याचे दिसून येते
उद्घाटन फ्लेक्स बोर्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित बोर्ड वरती फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांचेच फोटो झळकल्याने काही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मात्र आमदार-खासदारांचा प्रोटॉकल पाळावा म्हणून फक्त नावांचा उल्लेख करण्यात आला असला तरी महाविकास आघाडीचे राजकारण कोरोना काळातही सुरू असल्याचे दिसू येते