अखेर माढा लोकसभेत होणार तुतारीचा गजर

1096
Adv

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात फलटणकर अथवा अकलूजकर तुतारी फुंकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे त्यामुळे माढा लोकसभेच्या निवडणुकीत रंगत येणार हे मात्र नक्की

भारतीय जनता पार्टीतर्फे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर मोहिते पाटील व नाईक निंबाळकर कुटुंबाने प्रचंड विरोध केला होता मात्र महायुतीच्या नेत्यांनी उमेदवार बदलला गेला नाही येत्या नऊ तारखेला म्हणजेच गुढीपाडव्या दिवशी अकलूजकर अथवा फलटणकर आपल्या उमेदवारीची घोषणा करणार असून उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पहिल्याच दिवशी या दोन दिग्गज नेत्यांपैकी एक नेता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार हे जवळपास निश्चित झाले असून फलटणच्या नेत्यांकडे कार्यकर्त्यांची गेल्या चार दिवसापासून गाठीभेटीचा सिलसिला झाल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे

पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या माढा मतदारसंघाकडे लागले असून मोहिते पाटील अथवा नाईक निंबाळकर कुटुंबाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर महायुतीला अनपेक्षित निकाल ला सामोरे जावे लागणार यात तीळ मात्र शंका नसून फक्त उमेदवार नक्की कोण याचीच उत्सुकता आता फक्त बाकी राहिली आहे

Adv