राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या येथील ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले.

573
Adv

पिंपोडे बुद्रुक , ता. २०, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या येथील ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्वपक्षीयांच्या श्री घुमाई देवी भैरवनाथ शेतकरी पॅनेलने सरपंच पदासह नऊ जागांवर विजय मिळवला. पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंखे, माजी सदस्य अशोकराव लेंभे, माजी सरपंच विकास साळुंखे, जनार्दन निकम व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमृतराव जायकर यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री घुमाई देवी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला पराभवाचा धक्का बसला. त्यांना सात जागांवर समाधान मानावे लागले. थेट सरपंच पदाची ही निवडणूक एका अपक्ष उमेदवारीमुळे अतिशय रंगतदार झाल्याने निकालाबाबत उत्सुकता होती. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. शेतकरी पॅनेलच्या डॉ. दीपिका लेंभे यांना २३२६ आणि ग्रामविकास पॅनेलच्या डॉ. रुपा लेंभे यांना २०७२ मते मिळाली. डॉ. दीपिका लेंभे २५१ मतांच्या फरकाने विजयी झाल्या. अपक्ष उमेदवार वनिता साळुंखे यांना २५६ मते मिळाली.

विजयी उमेदवार व कंसात पडलेली मते पुढीलप्रमाणे — श्री घुमाई देवी भैरवनाथ शेतकरी पॅनेल- –भरत निकम (४६२) सविता निकम (४४४) कोमल कर्पे (५०६), संग्राम लेंभे (५३५), परमेश्वर गार्डी (५६७), रणजीत लेंभे (६०३) , लक्ष्मी मदने (५९८), अक्षता जाधव (६४०). श्री घुमाई देवी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते पुढीलप्रमाणे — शरद साळुंखे (६१५), वनिता सपकाळ (५४२), चंद्रकला गुरव (५७९) रतनलाल साळुंखे (५५२), निलेश केंजळे (५६०), वर्षा कांबळे (५८४), दिपाली कदम (५७३). राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे, चंद्रकांत निकम, सुरेश निकम, अमोल निकम, विजय लेंभे, संजीव साळुंखे, सागर लेंभे, दीपक पिसाळ, भरत साळुंखे, जी. डी. वाघांबरे, नरेंद्र वाघांबरे यांनी शेतकरी पॅनेलचे नेतृत्व केले.

Adv