पिंपोडे बुद्रुक (प्रतिनिधी) उत्तर कोरेगाव तालुक्यातील मध्यवर्ती व्यापारी बाजारपेठेचा ठिकाणी एसटी स्टँड समोर असणाऱ्या पेट्रोल पंपा शेजारी श्रीराम किराणा दुकान च्या इमारतीमध्ये खाजगी कोचिंग क्लास आहे या क्लासमध्ये याच गावातील इयत्तत्ता अकरावी वय वर्षे सोळा शिकत असणाऱ्या मुलीचा सकाळी दहाच्या सुमारास जात होती यावेळी तिचा पाठलाग करत याच गावातील निखिल कुंभार नावाचा युवक हा तिचा पाठलाग करीत आला होता त्या युवकाचे त्या मुलीवर एकतफी प्रेम होते यातूनच निराश झालेला कुंभा२ने मागचा पुढचा विचार न करता क्लास मध्ये जाऊन तिच्यावर धारदार चाकूने वार केले, सदरची मुलगी ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती उपचारासाठी दवाखान्यात नेले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला
हे त्या युवकाच्या निदर्शनाला आल्यानंतर त्या युवकाने विष प्राशन केले व तोही बेशुद्ध पडला सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली या या घटनेची माहिती मिळताच वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि बोंबलेव त्यांचे सहकारी यांनी तातडीने त्या युवकास अटक केली सदर आरोपीस अटक झाल्याने महिला व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वाठार पोलिसांनी अशा रोड रोंमीवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे