पिंपोडे बुद्रुक (प्रतिनिधी )उत्तर कोरेगांव तालुक्यातील खामकरवाडी येथील जोशना सावंत या महिलेने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा दिशारा दिला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरेगाव तालुक्यातील खामकरवाडी येथील एका महिलेने आत्मदहनाचा इशारा दिला आहे शेत जमिनीच्या वादातून गावातील किसन सावंत, सचिन सावंत, कुमार सावंत, हे वारंवार घाण घाण शिवीगाळ करून माझ्या कुटुंबाला मारहाण करीत आहेत त्यामुळे आमची मानसिक स्थिती पूर्णपणे खालावली आहे त्रास सहन करण्यापेक्षा एकदा जीवन संपवले बरे सदर बाबत शासन दरबारी तक्रार करूनही आमच्या सावंत कुटुंबाला न्याय मिळत नाही सतत मारहाण करीत असल्यामुळे जगावे की मरावे अशी बिकट अवस्था झाली आहे सन 20 /2012 पासून आमच्या कुटुंबाला नाहक त्रास दिला जात आहे आमची स्वतःची जमीन असून देखील आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे मला व माझ्या कुटुंबाला शासन दरबारी न्याय मिळत नाही काही कारण काढून गावातील गावगुंड हे सतत मारहाण करत आहेत त्यांच्या या जाचाला कंटाळून गावामध्ये येऊन मारहाण करीत आहेत परवा तर मला चांगलेच मारले त्यामुळे हाताला मार लागल्याने काहीही काम करता येत नाही आमचे कुटुंब पुर्णपने हे गाव गुंडांच्या दहशती खाली आले आहे त्यामुळे मी व माझे कुटुंब जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे याबाबत शासन दरबारी तरी आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही अपेक्षा मी व्यक्त करीत आहोत
Home Satara District Koregaon खामकरवाडी येथील येथील गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याचा माहिलेचा इशारा….