सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील करंजखोप गावाने गावातील पूर्ण गावचा विचार करून वयोवृद्ध ग्रामस्थ आणि शालेय मुलांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून गावात बॅन्जो व
डॉल्बी बंदी ठराव बहुमताने मंजूर केला असून या निर्णयाचे जिल्ह्यात स्वागत होत आहे
करंजखोप या गावी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावच्या सरपंच राधिका धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली बॅन्जो डॉल्बी मुक्त हा ठराव करून पुढील कार्यवाहीसाठी हा ठराव वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्याकडे देण्यात आला
येत्या काही दिवसातच गणेशोत्सव नवरात्र,आदी सण तोंडावर आले आहेत अशा वेळी हा निर्णय झाल्याने इतर ही गावाने हा निर्णय घ्यावा अशी चर्चा होत आहे