खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून या बैलगाडी शर्यतीची नोंदणी शर्यती दिवशी सकाळी ९ ते १० या
वेळेत करण्यात येणार आहे.यापुढे येणाऱ्या स्पर्धकांची नाव नोंदणी केली जाणार नाही.स्पर्धेसाठी प्रवेश फी १ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.शर्यतीसाठी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत
खा.श्री छ.उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थ,
तरुण युवक मंडळ व उदयनराजे मित्रसमूहाच्या वतीने शुक्रवार, दि. ३मार्च रोजी सकाळी १०.३०वाजताश्री कोल्हेश्वर देवस्थान, तांदुळवाडी येथेभव्य बैलगाडी शर्यतीचेआयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक काका धुमाळ यांनी दिली.
या शर्यतीच्या विजेत्याला ७७ हजार ७७७ व चषक, द्वितीय क्रमांकास ५५ हजार ५५५ रुपयेव चषक आणि तृतीय क्रमांकास ३३ हजार ३३३ व चषक चतुर्थ क्रमांकास११ हजार १११ व चषक,पाचव्या क्रमांकास ७ हजार७७७ वचषक,सहाव्या क्रमांकास ५ हजार ५५५ वचषक,सातव्या क्रमांकास ३ हजार ३३३ व चषक देण्यात येणार आहे,अशी माहिती काका धुमाळ यांनी दिली.