कोणत्याही परिस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा

520
Adv

कोणत्याही परिस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाला मिळावा अन्यथा आम्ही वेगळा विचार करणार असल्याचा निर्धार मुंबईतील बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला

मुंबईमध्ये सातारा माढा लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने बैठक बोलावली होती यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रूपाली चाकणकर, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार मकरंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

साताऱ्यात पेक्षा माढा लोकसभा मतदारसंघावर या बैठकीत जास्त चर्चा झाली कुठल्याही किमतीवर कोणत्याही परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माढा लोकसभा निवडणूक लढवणारच व तो महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा अन्यथा आम्ही वेगळा विचार करणार असल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर केली

जर माढा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाले नाही तर पदाधिकारी तळागाळातील व कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही असे स्पष्ट मत काही लोकप्रतिनिधी यांनी यांनी व्यक्त केले आहे

Adv