राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार श्रीनिवास पाटील व त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांनाच सातारा लोकसभेच्या निवडणुकी साठी राष्ट्रवादी पक्षातून अंतर्गत जोरदार विरोध होत असल्याची चर्चा राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासह जिल्ह्यात रंगू लागली आहे
लोकसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांची उमेदवार शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे याउलट सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्र असल्याने विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील व त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांना आता पक्षातून जोरदार विरोध असल्याची चर्चा रंगू लागली आहे ज्या जिल्ह्यातील विधानसभेच्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेच्या निवडणूक दरम्यान खासदार श्रीनिवास पाटील यांचे काम केले या सर्व मंडळींना खासदार पाटील यांनी डावलून विरोधी नेत्यांना विकास कामाचा फंड दिल्याने खासदार पिता पुत्र यांच्यावर नाराजीचा सूर उमटला आहे
जावली,कराड दक्षिण,पाटण कराड उत्तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलून विरोधी पक्षाच्या आमदारांसह जिल्हा परिषद सदस्य यांना खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपला विकास कामाचा फंड दिल्याने पक्षातूनच नाराजी उमटली आहे या नाराजीचा सूर लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकतो की नाही हे बघणे आता उत्सुकतेचे असेल दरम्यान सातारा लोकसभा निवडणुकीसाठी पार्टी तर्फे सुनील माने सत्यजित पाटणकर इच्छुक असल्याचे समजते