लोकसभा लढण्याची इच्छा असलेले सुनील माने स्वीकृत नगरसेवक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे लोकसभेचे इच्छुक उमेदवार थेट स्वीकृत नगरसेवक अशी चर्चा रहिमतपूरात रंगत आहे
गेल्या लोकसभेच्या निवडणुकी वेळी सातारा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी सुनील माने हे इच्छुक होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्याऐवजी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली त्यांची इच्छा लोकसभा लढण्याची होती ते मात्र पालिकेत स्वीकृत नगरसेवक झाल्याने अनेकांच्या भव्या उंचवल्या आहेत देशाच्या राजकारणात राजकारण करू पाहणारे सुनील माने पालिकेच्या माध्यमातून शहरापुर तेच मर्यादित राहिले आहेत
ज्यांची इच्छा देशाच्या राजकारनात राजकारण करायची असते त्यांनी राजकारणत माघारी येणे म्हणजे राजकारणात असलेली अपरिपक्वताच म्हणावी लागेल कोणी कुठल्या पदावर बसावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी सुनील माने यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाची जिल्ह्यात चांगली चर्चा रंगते






