कराड उत्तर मध्ये महायुतीची मोर्चे बांधणी

589
Adv

विद्यमानआमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध मनोज घोरपडे यांच्यात समोरा समोर लढत झाली तर मनोज घोरपडे होऊ शकतात कराड उत्तरचे उत्तर अधिकारी त्याला कारणही तसेच आहे गेल्या पाच वर्षापासून मनोज घोरपडे यांनी आपल्या कामातून दांडगा जनसंपर्क गोळा केला असून चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना कराड उत्तर या मतदारसंघातून भरघोस मतदान मिळवून देण्यात त्त्यांचा सिहंचा वाटा आहे त्यामुळे सध्याच्या स्थितीला मनोज घोरपडे कराडचे उत्तर अधिकारी होण्यास कोणतीही अडचण वाटतं नाही

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात महायुतीने तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू ठेवली आहे .यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व कराड उत्तरचे भाजपचे नेते मनोज घोरपडे यामध्ये कोणाला संधी मिळणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे

या मतदारसंघावर अजित दादा पवार गट व शिंदे सेना या दोघांनीही दावा सांगितल्याने उमेदवार निश्चिती नंतर येथील चित्र स्पष्ट होणार आहे कराड उत्तर मतदारसंघ हा आ बाळासाहेब पाटील यांचा गड मानला जातो गेले चार टर्म बाळासाहेब येथून आमदार झाले आहेत 2014 पासून भाजपने सुद्धा या मतदार संघात चांगलेच वातावरण तयार केले आहे

मनोज घोरपडे यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये बूथ प्रमुख मंडल प्रमुख रचनात्मक कार्यक्रम इत्यादीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरू ठेवली आहे,2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे अशी तिरंगी लढत झाली होती त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत धैर्यशील कदम यांनी धनुष्यबाण उचलला मनोज घोरपडे यांनी अपक्ष रिंगणात उडी घेतली येथे तिरंगी लढत झाली यंदाच्या निवडणुकीतील राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही

तुतारीच्या विरोधात घड्याळ धनुष्यबाण की कमळ हे चित्र उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल कराड उत्तर मध्ये काँग्रेसची भूमिका किंग मेकर ठरणार आहे गत निवडणुकांचा विचार करता काँग्रेसने आघाडी धर्म येथे पाळला होता मात्र मध्यंतरी मतभेद झाले आहेत त्यामुळे उत्तरेत काँग्रेसचा उदयसिंह उंडाळकर गट कोणती भूमिका घेतो हे महत्त्वाचे आहे राष्ट्रवादी दोन गट पडल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्या बरोबर राहणे पसंत केले होते मात्र भाजपच्या चिन्हावरून लढण्यासाठी मनोज घोरपडे धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ इच्छुक आहेत ही जागा भाजपला सोडली जाणार की 2019 च्या फॉर्मुल्याप्रमाणे भाजपमधून आयात केलेल्या उमेदवार कडे हाती घेणार हे पहाणे औत्सुक्याचे आहे

कराड उत्तर विधानसभा 2019 निवडणूक

बाळासाहेब पाटील 100509 मते

,मनोज घोरपडे – 52 हजार 254 मते

धैर्यशील कदम 39 हजार 791 मते

एकूण मतदान

पुरुष एक लाख 54 हजार 628

स्त्री एक लाख 49 हजार 831

एकूण मतदार 304466

Adv