भाजप प्रभारी व राष्ट्रवादीचे माजी मंत्री यांची बाजार समितीसाठी युती

230
Adv

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार मंत्री राहिलेल्या आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे प्रभारी असलेले अतुल भोसले हे एकत्र येऊन बाजार समितीची निवडणूक लढवत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप हेच दोन प्रबळ पक्ष आता जिल्ह्यात एकमेकांसमोर निवडणुकीच्या माध्यमातून समोरासमोर उभे राहणार आहे त्या अगोदरच राष्ट्रवादीचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांची बाजार समितीच्या निवडणुकीत युती झाल्याने येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या काळात कोणत्या प्रकारे हे सन्माननीय नेते एकमेकांवर टीका करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजप तर्फे मनोज घोरपडे व धैर्यशील कदम हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून या बाजार समितीच्या निवडणुकीचा परिणाम या दोन्हीही नेत्यांवर होणार यात तीळ मात्र शंका नाही असा विश्वास येथील जनता व्यक्त करत आहे

गेल्या वर्षी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली बँकेच्या निवडणुकीदरम्यान राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील होते त्यांना काही मते कमी पडत असताना त्यांनी भाजपचे लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांच्याशी संपर्क साधून आपल्याला मतदान करण्यास सांगितले मात्र भाजपचे लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी तुम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात वरिष्ठ नेते तेव्हाचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्याशी बोला मी तुम्हाला सहकार्य करीन असा शब्द दिला

आमदार बाळासाहेब पाटील यांनीही या निवडणुकी दरम्यान तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला ? बाळासाहेब पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा संपर्क झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी यासंदर्भात अतुल भोसले यांना संपर्क साधून तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे सोपे वाटेल त्यासाठी कोणाला जिल्हा बँकेला मदत करावी लागत असेल तर करा असा कानमंत्र दिला असल्याचे समजते?

एकंदरच राष्ट्रवादी व भाजप नेते हे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान समोरासमोर येऊन एकमेकांवर टीका करणार हे नक्कीच मात्र सर्वसामान्य जनता व मतदारांना या सर्व नेत्यांनी गृहीत धरल्यानेच जिल्ह्यातील नेते पाहिजे तेव्हा विरोधी पक्षा बरोबर संगणमत करून आपला विजय मिळवतात या अशा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीना मतदारांनी आपल्या मत दानातून ताकद दाखवावी अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक करू लागले आहेत

Adv