उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातारा जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात लोकसभा व विधानसभेला विरोधी काम केलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भरती असल्याचे आज दिसून आले याप्रकरणी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर मूग गळून गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर त्यांनायांना फक्त फलटणकरच महाविकास आघाडीचे नेते म्हणून माहिती आहे का काय असा प्रश्न आज राष्ट्रवादीचा कार्यालयातच उपस्थित जाहला त्याला कारणही तसेच लोकसभेला प्रदीप विधाते यांनी महा विकास आघाडीचे काम केले आता तेच प्रदीप विधाते मंत्री मकरंद पाटील यांच्या शेजारी राष्ट्रवादी कार्यालयात बसून चर्चा करताना दिसून येतात तर दुसरीकडे माढा लोकसभा व विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांवर टीका करताना आपण सुरेंद्र गुदगे यांना पाहिले तेच सुरेंद्र गुदगे मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यालयात एका छोटे खानी कार्यक्रमात पुढच्या लाईनीत बसल्याने आश्चर्य व्यक्त केले मग याप्रकारे बाळासाहेब सोळसकर हे गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे
फलटणकर यांनी फक्त महाविकास आघाडीचे काम केले म्हणून टपका ठेवणारे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांना हे दोन नेते दिसले नाहीत का फलटणकर विरोधी म्हणून त्यांच्यावर टीका करायची व आपलं वर्चस्व वाढवायचं अशीच भूमिका जिल्हाध्यक्ष यांची नाही ना अशी चर्चा रंगत आहे