मौजे गांजे, ता. जावळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ‘परिसंवाद यात्रा नियोजन’ व ‘विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम’ आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थित संपन्न झाला जावळीतील जनतेचे जे प्रेम २००९ पर्यंत होते तेच प्रेम तीच आपुलकी आजही कमी झालेली नाही. भूमिपूजन समारंभ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची परिसंवाद यात्रा याचे नियोजन करण्यासाठी पहिल्या प्रथमच गांजे गावात जाहीर मेळावा झाला असुन गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.होते जावळी मधील जनता आजही तितकेच प्रेम करते व माझ्या मागे ताकतीने उभी राहते हे चित्र काल झालेल्या मेळाव्यात दिसून आले. इतकी वर्ष समाजकारण राजकारण करताना काय कमावले तर जनतेचे हेच प्रेम कमावले. आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांची जोपासना करताना संबंध महाराष्ट्रभर पवार साहेबांचा सच्चा मावळा म्हणून ओळखले जाते ही माझ्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी केले
यावेळी गांजे गावामध्ये घरातघरकडे जाणारा रस्ता खडीकरन डांबरीकरन,येथील सम्राटनगर मधील रस्ता खडीकरन डांबरीकरन,मोठ्याचीवाडी मधील रस्ता खडी करन डांबरीकरन, लिगाडेवाडीमधील रस्ता खडीकरन डांबरीकरन आदी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमास माजी आमदार श्री. सदाशिवराव सपकाळ, माजी शिक्षण सभापती श्री. अमित कदम, श्री ऋषिकांत शिंदे, सौ. समींद्रा जाधव, कु. पूजा काळे तसेच गांजे परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.