आ शशिकांत शिंदे साहेब नक्की बूस्टर डोस ची गरज कोणाला?

411
Adv

जावलीमध्ये विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी एक वक्तव्य केले होते की सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीला बूस्टर जोर ची गरज आहे शिंदे साहेब नक्की डोस कोणाला द्यायचा अशी चर्चा आता जावलीतील सर्वसामान्य जनता एकमेकांच्या कानात कुजबुजत आहे

जावली बाजार समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर फक्त मोठी मोठी भाषणे करून आपण पक्षासाठी कसे काम करत असतो हे सांगण्याचाच एक प्रयत्न असतो सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे फक्त राष्ट्रवादी पक्षाला बूस्टर डोस देण्याची गरज असल्याचे वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी जावली मध्ये अजित दादांच्या उपस्थित केले होते मात्र आमदार शशिकांत शिंदे हे भाजप आमदार यांच्या बरोबर जावली बाजार समितीमध्ये निवडणूक लढवत असल्याने आमदार शशिकांत शिंदे साहेब तुम्हीच सांगा नक्की बूस्टर डोस कोणाला द्यायचा असा प्रश्न जावलीतील जनतेला पडला आहे

जावलीमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होत असून राष्ट्रवादीचे खरे निष्ठावंत कोण अशी चर्चा जावली तालुक्यात रंगू लागली आहे

सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली व पक्षा बरोबर राहिले तर राष्ट्रवादी पक्षाला बूस्टर डोस घ्यायची गरजच भासणार नाही हा बालेकिल्ला विरोधकांना पुन्हा बूस्टर डोस न घेता घाम फोडल्याशिवाय राहणार नाही हे नक्की मात्र आपल्याच सहकाऱ्यांच्या पायात पाय घालून एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवणे हे एक प्रकारे भविष्यात राष्ट्रवादी पक्षाला घातक असल्याचे दिसून येत असून अजित दादा म्हणाले होते जावली तालुक्यात राष्ट्रवादी चमत्कार घडवेल तो कसा काय हे आता येणारा काळच ठरवेल

मात्र वरिष्ठ नेते आले की भाषणात एक बोलायचे आणि त्यांच्या पाठीमागून कृतीतून वेगळे बोलायचे यातून सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण होत असून येणाऱ्या काळात ही असे चालले तर राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला कोसळणार हे नक्की

गोंडस सहकार च्या नावावर पक्ष राहतो बाजूला जरी सहकारात पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली जात नसली तरी वर्षानुवर्षे आपण पक्षाच्या नावावरच आपण जनसामान्यात वावरत असतो म गोंडस सहकार च्या नावाखाली निवडणुकीत आपण पक्षाच्या चिन्हाला कसे विसरतो हे कोडे मात्र जनतेला न उलगडणारे आहे

आमदार शशिकांत शिंदे यांना विधानसभेला आपला पराभव पत्करावा लागला त्याला कारण ही तसेच होते दोन्हीही राजे भाजपमध्ये सामील झाले व दोन्ही राजेंचा कोरेगाव मतदार संघावर प्रभाव असल्याने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला या पराभवाचा वचपा काढायचा असेल तर दोन्हीही राजे यांच्याशी जुळवून घेऊन आपण पराभवाचा वाचपा काढू शकतो अशी द्विधा मनस्थिती तर आमदार शशिकांत शिंदे यांची नसेल ना अशी चर्चा कोरेगाव व जावली तालुक्यात रंगत आहे

Adv