अमित कदम वसंतराव मानकुमरे दिलजमाई?

496
Adv

अमित कदम यांच्यावर वसंतराव मानकुमरे यांनी चार फुट्या म्हणून भर सभेमध्ये वक्तव्य करून अमित कदम यांची खिल्ली उडवली होती आता त्याच वसंतराव मानकुमरे यांच्याबरोबर अमित कदम जावली बाजार समिती एक दिलाने लढवत असल्याने या दोन्हीही नेत्यांमध्ये दिलजमाई तर झाली नसेल ना असे आश्चर्य व्यक्त व्यक्त केले जात आहे

माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे हे संभाषण करण्यात पटाईत असून राष्ट्रवादीचे युवा नेते अमित कदम यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या अगोदर जावली मध्ये मानकूमरे यांनी भर सभेमध्ये अमित कदम यांची चार फुट्या म्हणून खिल्ली उडवली होती याला जोरदार हशाही पिकला होता मात्र आता हे सर्व विसरून अमित कदम त्याच माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून जावली बाजार समितीमध्ये पक्षाच्या विरुद्ध निवडणूक लढवत असुन हे सर्व नेते एकच तर नाही ना असा सवाल जावलीतील जनतेला पडला आहे

अमित दादा घराण्याचा वारसा व मानसन्मान जपा

अमित कदम यांच्या घराण्याला राजकीय वारसा खूप मोठा असून कदम कुटुंबीयांनी सर्वसामान्य माणूस जपण्याचे काम केले मात्र स्वाभिमान कधी बाजूला ठेवला नाही. मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत मानकुमरे यांच्याबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याने जावलीतील जनता नाराज झाल्याचे दिसते त्यामुळे दादा घराण्याचा वारसा व स्वाभिमान जपा एवढीच अपेक्षा जावलीतील जनता करत आहे

Adv