कुडाळ येथील मेळाव्यासाठी पवार साहेबांना निमंत्रण

252
Adv

आज सकाळी मुंबई येथील शरद पवार साहेब यांच्या सिल्वर ओक येथील बंगल्यावरती दीपक पवार यांची जिल्ह्याच्या व सातारा विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली, आणि बदलाचे वातावरण असताना त्याचबरोबर सातारा विधान सभा मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी शरद पवार साहेब यांना कुडाळ तालुका जावली येथे शेतकरी मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आले.

नुकतेच विरोधी पक्ष नेते अजितदादा जावली मध्ये येऊन गेल्याने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.अशा प्रसंगी राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब यांना आमंत्रित करून संपूर्ण सातारा विधानसभा मतदारसंघाचा शेतकरी मेळावा घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे.लवकरच कुडाळ येथील मेळाव्यासाठी पवार साहेब यांनी वेळ देण्याची व येण्याचे कबूल केलेले आहे त्याचबरोबर, मेळाव्याचे नियोजनाविषयी चर्चा झाली आहे.

लवकरच तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांबरोबर व नेत्यांबरोबर चर्चा करून वेळ निश्चिती कळवली जाईल असे दीपक पवार यांनी सांगितले.

Adv