जावली बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध

453
Adv

जावली तालुक्यात राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगलेच तापू लागले असताना राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे व अमित कदम यांच्या नेतृत्वाखाली जावली बाजार समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा पहिला श्री गणेशा झाला आहे

जावली _ महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली असून आज हमाल मापाडी गटातील सुंदर गोविंद भालेराव हे बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादीने एक जागा बिनविरोध निवडून आणून निवडणूकी पूर्वीच राष्ट्रवादीने विजयाची नांदी केली आहे.
जावली – महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी १८ जागेसाठी ११९ अर्ज छाननी मध्ये पात्र झाले आहेत .आजपर्यंत दोघांनी माघार घेतली असून व एक बिनविरोध झाल्याने ११६ अर्ज अध्याप बाकी आहेत.
माजी जलसंपदा मंत्री आ . शशिकांतजी शिंदे यांना मानणाऱ्या व अमितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली संजय आनाजी तांबे यांनी हमाल / माथाडी गटातून माघारी घेतल्याने सुंदर गोविंद भालेराव हे या गटातून निवडणूकी पूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. या प्रसंगी अमितदादा कदम यांचे शुभहस्ते सुंदर भालेराव यांचा तसेच त्यांना बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या संजय तांबे यांचा सत्कार कार्यकत्याच्या अस्थीतीत करण्यात आला.

जावली बाजार समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा श्री गणेशा झाल्याने येणाऱ्या काळात याचा राष्ट्रवादी पक्षाला नक्कीच फायदा होणार असल्याचे दिसून येते मात्र विरोधी गटाला हमाल या गटातून उमेदवार मिळाला नसल्याचे दिसून आले

Adv