जावली बाजार समितीचा पराभव हा राष्ट्रवादीच्या आमदारांचा पराभव

825
Adv

जावली बाजार समितीच्या निवडणुकीत तीन आमदार विरुद्ध दीपक पवार अशी लढत झाली यामध्ये दीपक पवार यांचा पराभव झाला असला तरी समाधानकारक त्यांना मतदान झाले असल्याचे जावली येथील नागरिक म्हणत आहे

ऐन निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे व आ मकरंद पाटील यांनी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बरोबर हात मिळवणी करून स्व पक्षाच्या नेत्याच्या विरुद्धच बाजार समितीची निवडणूक लढवली राष्ट्रवादीच्या या दोन्ही आमदार व अमित कदम यांच्या बाबतीत जावलीतील राष्ट्रवादी येथील मतदार नाराज असून यापुढे राष्ट्रवादी म्हणून दीपक पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ठाम भूमिका मतदारांनी घेतली असून जरी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दीपक पवार यांचा पराभव झाला असला तरी हा पराभव हा विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक प्रकारे पराभव असल्याची चर्चा जावली येथील जुने राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणत आहेत

राष्ट्रवादीच्या स्टेजवरून दीपक पवार यांनी घोषणा केली होती की एकत्र राहिलो तरच आपण भाजप विरुद्ध लढू शकतो मात्र राष्ट्रवादीचेच आमदार भाजपबरोबर गेल्याने राष्ट्रवादीचे जावलीतील नेते आमदार शशिकांत शिंदे अमित कदम यांच्या बाबतीत विश्वास राहिला नाही

राष्ट्रवादी पक्षाचे आमदारच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विरुद्ध गेले तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जावली तालुक्यात नक्कीच भाजपचे वर्चस्व राहील हे जावली बाजार समितीच्या निकालानंतर स्पष्ट होते

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आमदार मकरंद पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी जावली बाजार समितीमध्ये एकत्र निवडणूक लढवली असती तर आज वेगळे चित्र दिसले असते अशी कुजबूत जावलीतील जनता करत आहे

Adv