वैदिक विश्व ज्येष्ठ नागरिक संघ व योगाभ्यास संस्था यांना सर्वतोपरी सहकार्य करणार उपनगराध्य़क्ष किशोर शिंदे

48
Adv

ज्येष्ठ नागरिकांकरता पालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबवण्यात येतात. प्रतापसिंह उद्यानात प्रशस्त हॉल दिला आहे. वैदिक विश्व योगाभ्यास संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना योगाचे मार्गदर्श दिले जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्यावतीने आमचे सर्वतोपरी सहकार्य राहणार आहे, असे प्रतिपादन सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केले. येथील छ. प्रतापसिंह उद्यानामधील ज्येष्ठ नागरिक भवनात सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी योगाभ्यास व इतर उपक्रम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण दीक्षित, कार्याध्यक्ष सुभाष सरदेशमुख, अनिल वायकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना किशोर शिंदे म्हणाले, छत्रपती प्रतापसिंह उद्यानात बांधलेले ज्येष्ठ नागरिक भवन हे सर्व ज्येष्ठ नागरिक संघांसाठी ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी 24 तास खुले राहिल. सर्व ज्येष्ठ नागरिक संघांनी या जागेचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी बोलताना राजू गोडसे म्हणाले, गेली सात वर्ष वैदिक विश्व ज्येष्ठ नागरिक संघ व योगाभ्यास संस्था सातारा शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवत आहेत. काही व्यक्तींच्या आडमुठय़ा धोरणामुळे वैदिक विश्व संस्थेला गेली दोन वर्ष छत्रपती प्रतापसिंह उदय्नातील ज्येष्ठ नागरिक भवनात उपक्रम राबवून दिले जात नव्हते. वैदिक विश्व संस्थेचे सर्व सदस्यांनी माझ्याबरोबर श्री.छ.उदयनराजे यांची भेट घेवून सदर ज्येष्ठ नागरिक भवनाची जागा संस्थेला वापरण्यास मिळावी अशी विनंती केली होती. त्यासाठी श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी तात्काळ सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना बोलवून सदर ज्येष्ठ नागरिक भवनाची चावी तातडीने वैदिक विश्व संस्थेला देण्यास सांगितली. त्या प्रमाणे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी तातडीने नवीन चावी दिली. सदर संस्थेने आज योगाभ्यास केंद्र व ज्येष्ठ नागरिक संघाचे इतर उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. त्याचा शुभारंभ करण्यात आला. याचा मनस्वी आनंद होत आहे. वैदिक विश्व संस्था, योगाभ्यास केंद्र आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांनी शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना समावून घेवून चांगले उपक्रम राबवावेत, असे आवाहन श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी केले आहे, अशी माहिती राजू गोडसे यांनी दिली.

संस्थेतर्फे लक्ष्मण दीक्षित यांनी श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे, उपनगराध्यक्ष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजू गोडसे यांचे आभार मानले.एस.एस.पटर्वन यांनी प्रास्ताविक केले. एस.यु.मस्के यांनी आभार मानले. संपत वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी के.डी.कुलकर्णी,सुभाष पालेकर, विनस हलगीकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Adv