केंद्र व राज्य शासनाचे प्रत्येकी ५० टक्के निधी असलेल्या राष्ट्रीय जल जीवन मिशन योजने अंतर्गत सातारा जिल्हयातील महाबळेश्वर, कराड,पाटण आणि सातारा या तालुक्यातील विविध ठिकाणी हर घर नल से जल या धोरणानुसार पाणी पुरवठयाच्या योजनांचा समावेश करण्यात आला असून,
सन २०२१-२२ चे जिल्हा वार्षिक योजनेत एकूण १ कोटी ७५ लाखांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत अशी माहीती खा श्री छत उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
याविषयी अधिक माहीती नमुद करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, पाणी हे जीवन म्हणूनही ओळखले जाते. पाण्यावरच सर्व काही अवलंबून असते. दैनंदिन जीवनात आपल्या सर्वांच्या कुटुंबातील महिलेला पाण्याचे जास्त महत्व समजत आले आहे. पूर्वी जवळच्या पाणवठा किंवा नदी किनारी मानवी वस्ती होत असे. पुढे जसा विकास होत गेला तश्या सुविधा होत राहील्या
तरी सुध्दा आजही कित्येक गावांमध्ये पाणी आणण्यासाठी दूर अंतरावर जावे लागत आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी केंद्र शासनाने हर घर, नल से जल ही अभिनव योजना राष्ट्रीय जल जीवन योजनेच्या माध्यमातुन राबविणेस सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत आम्ही प्रस्तावित केलेली खालील कामांचा समावेश सन २०२१ -२२ चे जिल्हा वार्षिक आराखडयात करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत खालील कामे मार्गी लागणार आहेत ती पुढील प्रमाणे
१. सातारा तालुका- साबळेवाडी-विस्तारीत पाणीपुरवठा. अंदाजपत्रकीय रक्कम रुपये २० लाख
२. सातारा तालुका- वेळे- पाण्याची टाकी बांधणे अं.र. २० लाख
३. सातारा तालुका- बोर्णे- पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे- ५ लाख
४. महाबळेश्वर तालुका- माचुतर येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे रुपये १० लाख
५. महा.तालुका
– हातलोट- पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे- ५ लाख
६. महा.तालुका- वारसोळी- पिण्याच्या पाण्याची साठवण टाकी बांधणे-५ लाख
७. महा.तालुका- रामेघर- पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे- रुपये १० लाख
८. महा.तालुका- सौंदर्दी- पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे- ५ लक्ष
९. महा.तालुका- एरण- पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे- ५ लाख
१०.महा.तालुका- कुमठे- पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईन टाकणे-१० लक्ष
११.कराड तालुका- घोगांव- नवीन पाण्याची टाकी बांधणे- ५ लक्ष
१२.कराड तालुका- कार्वे- नवीन नळ पाणीपुरठा पाईपलाईन करणे-१० लक्ष
१३.कराड तालुका- संजयनगर(शेरे) नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन करणे- १० लाख
१४.कराड तालुका- खुबी- नवीन पाण्याची टाकी बांधणे- रुपये १० लाख
१५.कराड तालुका- वारुंजी फाटा ते सहयाद्री हॉस्पिटल पर्यंत नळपाणीपुरवठा पाईपलाईन करणे-१०
लाख
१६.कराड तालुका-आटके पाण्याच्या टाकीपासून ते नाईकबा मंदिरापर्यंत नवीन नळपाणीपुरवठा
पाईपलाईन-५ लक्ष
१७.पाटण तालुका- कबुला हुसेन बाबा चिस्ती येथे पाण्याची टाकी बांधणे-१० लाख
१८.पाटण तालुका- तीर्थक्षेत्र धारेश्वर येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे- ५ लक्ष तसेच मौजे तासगाव ग्रामपंचायत अंतर्गत ब्राम्हणवाडी व मुळीक वाडी,तालुका सातारा येथील पाणीपुरवठा योजनेचे कामकाज जलजीवन मिशन आराखडयात समाविष्ट केले असून, त्यांची अंदाजे रक्कम रुपये २० लाख आहे वरील सर्व कामांचा समावेश जल जीवन योजनेत करण्यात आला असल्याने आणि राज्य व केंद्राकडून याबाबत निधी उपलब्ध होणार असल्याने लवकरच ही कामे अस्तित्वात येतील.या सर्व कामांचे श्रेय आम्हास सहकार्य करणा-या आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.