घाटाई देवी मंदिर परिसरात कलम 131 (1)(ब)लागू

390
Adv

 सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीत घाटवण, ता. सातारा येथील श्री घाटाई देवीची वार्षिक यात्रा दि. 13 ते 14 जानेवारी 2020 या कालावधीत भरणार आहे. या यात्रेसाठी सुमारे 40ते 50 हजार भाविक देवीच्या दर्शनासाठी खाजगी वाहनाने तसेच एस.टी.बसने, दुचाकी वाहनाने येत असताता. त्यामुळे घाटवण फाटा ते  मंदिरापर्यंत वाहतमकीची कांडी होत असते. तसेच कास पठाराकडे (घाटवण फाटा) जाणाऱ्यारोज पासून घाटाई देवी मंदिराकडे जाणारा मार्ग हा अरुंद आहे.

याकरीता पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33(1)(ब) नुसार प्राप्त अधिकारानुसार घाटवणफाटा-घाटाई देवी मंदिरा(घाटवण गाव)-जांभळेघर- वाळंजवाडी ते कास पठार अशी दि. 12 जानेवारी 2020 रोजीचे सकाळी 10 वा. पासुन ते दि. 15 जानेवारी 2020 चे सकाळी 7 वा. पर्यंत  एकेरी वाहतुक राहील. या नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाईस पात्र राहतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Adv