दिनांक 26/11/2019 रोजी मौजे निगडी येथे फॉ. कं. नं. 228 चे वनक्षेत्रात दोन वाघरी लावून वन्यप्राण्यांचे शिकार करण्याचा प्रयत्न वनाधिकारी यांनी उधळून लावला. निगडी येथील सुनील साळुंखे व युवराज उर्फ विकास संपत पवार हे दोघे निगडी गावचे वनक्षेत्रात वाघरी लावून शिकारीच्या प्रयत्नशील आहेत अशी पक्की खबर वनविभागाला सायंकाळी 6 चे दरम्यान मिळाली होती.
वनविभागाने तात्काळ निगडी फॉ कं नं 228 मध्ये सापळा लावला.त्यामध्ये वर नमूद दोन आरोपी अलगद वनविभागाचे जाळ्यात अडकले.आरोपींकडे 2 वाघरी,1कुर्हाड, निरगुडीच्या काटक्या, इत्यादी शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले.वनविभागाने पुढील तजवीज तपासासाठी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले
आहे.पुढील तपास सुरू आहे.सदर कारवाई उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा,सहायक वनसंरक्षक विश्वास भडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांनी वनरक्षक परळी प्रशांतकुमार पडवळ,वनरक्षक ठोसेघर राजकुमार मोसलगी, वनरक्षक रोहोट मारुती माने,वनरक्षक कण्हेर संजय धोंडवड,वनरक्षक सातारा सुहास भोसले,वनरक्षक पळसावडे रणजित काकडे,वनमजुर वसंत पवार यांनी केली.
वन्यप्राणी शिकार प्रकरणात आरोपी पकडत असताना वनविभागाच्या कर्मचारी यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधनसामग्री अथवा स्वसंरक्षणासाठी काहीच हत्यार वगैरे नसतो त्यामुळे नक्कीच वनकर्मचारी स्वतःच्या जीवावर उदार होऊन या शिकाऱ्यांना पकडत असतात.त्याकरिता वरीष्ठ वनाधिकारी यांनी याबाबतीत लक्ष घालून वनकर्मचारी याना
स्वसंरक्षणासाठी साहित्याचा पुरवठा करावा अशी मागणी वनरक्षक वनपाल संघटना सातारचे कार्याध्यक्ष प्रशांतकुमार पडवळ यांनी व्यक्त केली.