अतुल भोसले यांना मंत्री पदासाठी येळगावकर यांच्या शुभेच्छा

578
Adv

कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांना मंत्रीपदासाठी भाजपचे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत .. मंत्री पदासाठी शुभेच्छा असा दिला डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी संदेश

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला असून महाराष्ट्रातील आमदार महोदय यांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत सातारा जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी या पक्षातून कोणाची वर्णी लागणार हे मात्र अद्याप निश्चित झाले नाही त्यातच भाजपचेच माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी पहिल्यांदा निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार अतुल भोसले यांना सोशल मीडियाद्वारे मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत

सातारा जिल्ह्यातील अनेक आमदार महोदय यांनी मंत्रीपदासाठी आपापल्या पद्धतीने लॉबिंग हे केले आहे मात्र मंत्रिमंडळ विस्तार होणार कधी याची तारीख निश्चित नसून पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार अतुल भोसले यांना भाजपच्या माजी आमदाराने शुभेच्छा दिल्याने अतुल भोसलेंना मंत्रिपद मिळणार की नाही याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Adv