राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भाजप व पुन्हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षांमध्ये अनिल देसाई यांनी आज प्रवेश केला. ज्या पक्षाची सत्ता राज्यात असते अश्या पक्षात अनिल देसाई प्रवेश करतात अशी चर्चा मान खटाव तालुक्यात रंगलेली दिसते
आज पर्यंत केंद्रात व राज्यात ज्या पक्षाची सत्ता होती अशा पक्षातच अनिल देसाई हे प्रवेश करतात कारण की त्याला त्यांचा व्यवसायाला जोड देण्याची संधी मिळते अशी चर्चा खाजगीत रंगताना दिसते ज्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनिल देसाईंसाठी मंत्री जयकुमार गोरे यांचा वाईटपणा घेतला त्याच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनाअनिल देसाईंनी सोडून आता राजकीय पदासाठी मंत्रि मकरंद पाटील यांचा हात धरला असल्याचे सध्यातरी चित्र दिसून येते त्यामुळे देसाई यांनी एक प्रकारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विश्वासघात तर केला नाही ना अशी चर्चा रंगत आहे कारण का पक्षप्रवेशावळी लावलेल्या फ्लेक्स वरती श्रीमंत रामराजे यांना फोटोतुन ही वगळण्यात आले होते
त्यामुळे पक्षप्रवेश हा व्यवसायिक होता का राजकीय हे येणाऱ्या काळातच समजेल
कुंभ मेळाव्यासाठी ठेका मिळणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून जिहल्यात जोरदार रंगू लागली आहे… मान खटामध्ये देसाई कुटुंब हे राष्ट्रवादी बरोबर आणि सातारा जावली मध्ये भाजपबरोबर जरी आज देसाईचा पक्ष प्रवेश झाला असला तरी नक्की देसाई कुटुंब कोणत्या पक्षात एका ठिकाणी स्थिर राहणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे