सरकाळे साहेब क्या हुआ तेरा वादा?

598
Adv

एक वर्षांपूर्वी जिल्हा बँकेचे राजेंद्र सरकाळे म्हणाले होते की वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील वर्षी करणार मात्र तसे काही घडताना दिसत नसल्याने सरकाळे साहेब क्या हुआ तेरा वादा अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे

जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक असून आता आधुनिक वाल्मिकी या बँकेतील तिसऱ्या मजल्यासह जिल्ह्यात फिरत आहेत यांचे आका म्हणून आता संशयाची सुई पहिल्या मजल्यावर जाते अशी चर्चा जिल्ह्यात ऐकावयास मिळते बँकेची प्रथा परंपरा याचा सोयीस्कर विसर शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेत काहींना पडलेला दिसतो असे व्हायचे नसेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे यांनी आपली कामाची पद्धत बदलून प्रस्थापितांच्या दबावाला बळी न पडता तिसऱ्या मजल्याच्या अधिकाऱ्यांसह बँकेतील वर्षानुवर्षे एकाच जागी चिटकून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात व या बँकेत खरेच शेतकऱ्यांचे राज्य चालते हे दाखवून द्यावे

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेमध्ये विद्यमान प्रस्थापितांच्या आशीर्वादाने वर्षानुवर्षे तिसऱ्या मजल्यासह इतर मजल्यांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्यात होत नाहीत याला कारण प्रशासन चालवणारे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे सोशल मीडियावर याच मुख्याधिकारी राजेंद्र सरकळेंना शिव्यांची लाखोली वाहिली जाते मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर असलेल्या बँकेचे आपण एक सेवक आहोत याचा विसर मात्र या सरकाळेंना पडलेला दिसतो

प्रस्थापितांचा आशीर्वाद घेऊन आजपर्यंत सरकाळे यांनी आपली मोहमाया जमवली ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा पुतळा बँकेच्या आवरात असून त्यांचा आदर्श मात्र कोणी घेताना दिसत नाही

Adv