सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांचे एक जुने पत्र सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले असून तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी त्या पत्रावर शेरा मारला असून त्याचे पुढे काय झाले हे सर्वसामान्य सभासद शेतकरी वर्गाला कधी कळणार याची उत्सुकता लागली आहे
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक या ना त्या कारणाने चांगली चर्चेत असते आता दस्तुरखुर्द जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन यांनीच बँकेच्या भरतीच्या विरोधात मॅनेज भरती होत असल्याचे पत्र तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना दिले होते यावर स्थगिती द्यावी असा शेराही मंत्री महोदयांनी मारलेला आहे आता जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन असलेले देसाई यांच्या नेतृत्वात एक भरती प्रक्रिया सुरू आहे ती सुद्धा मॅनेजच म्हणावी का असा प्रश्न उपस्थित होत आहे
जिल्हा बँकेत काही संचालक वगळता इतर संचालक कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात