शेतकऱ्यांच्या जीवावर असलेल्या बँकेचा मुखियाच जर पैशाची उधळपट्टी करून विमान वारी करत असेल तर दिग्गजअसलेले संचालक याला चाफ लावणार का याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे
ज्या नागपुरात मंत्री महोदयांचा शपथविधी होता तिथे नां बँकेचे काम होते ना पै पाहुण्यांचे मात्र दर वेळेस याची त्याचे धरून आपली मोहमाया वाढवण्याचे कामच या शेतकऱ्यांची कळ न कळलेल्या सर..काळें…ना केली आहे याचाही भांडाफोड करण्यास आम्ही चौथा स्तंभ म्हणून कुठेही कमी पडणार नाही
शेतकऱ्यांच्या जीवावर ही बँक मोठी झाली देशात या बँकेचा नावलौकिक शेतकऱ्यांच्या योगदानामुळे आहे महाराष्ट्राचे राजकारण या बँकेतून हलते अशा ऐतिहासिक बँकेचा मुखिया ज्याला शेतकऱ्यांची सर न कळ कळेना तो खुशाल गोवा टू पुणे पुणे टू नागपुर विमान वारी करून आपली हाऊस फेडत असेल तर याला संचालक असलेले काका,बाबा,आबा,माई ताई,शेठ,नाना, भाऊ याला चाफ लावणार की पाठीशी घालणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून चेअरमन यांच्यासहित संचालक मंडळ ज्या विचारांचा वारसा घेऊन चालते त्याला जागणार की विमान वारी करणाऱ्याला पाठीशी घालणार हे बघणे उत्सुकतेचे असेल
विमान वारीचा स्वतःला खर्च परवडत नसेल तर विमानवारी पेक्षा रेल्वेचा प्रवास सुखकर झाला असता पण या महाशयांना बँकेच्या पदाची हवा डोक्यात असल्याने हवेतून जाण्यास जास्त आनंद वाटला असावा..