छ उदयनराजे भोसले यांच्या संपर्क दौऱ्याने अनेकांची मने जिंकली…

708
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

उंब्रज दि: श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या संपर्क दौऱ्यात कोडोली येथील जनाई मळाई यात्रा निमित्त श्रीच्या दर्शनाने उदयनराजेंच्या कपाळी पहिला गुलाल लावून त्यांना विजयाचे संकेत देण्यात आले.
या वेळेला रवी साळुंखे, रामदास साळुंखे, मनोज गायकवाड ,दिलीप जाधव, महेश निकम, श्रीकांत जाधव, आशिष जाधव यांच्यासह यात्रेसाठी आलेल्या भाविकांनीही श्री छ खा उदयनराजेंना विजयी करण्यासाठी खारीचा वाटा उचलणार असा शब्द दिला.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासमवेत सुनील काटकर ,मनोज घोरपडे, कुलदीप क्षीरसागर, रामकृष्ण वेताळ ,समृद्धी जाधव, संतोष नलावडे, संतोष कणसे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर नागठाणे व अतीत, काशीळ, हिंगनाळे येथील ग्रामस्थांनीही उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. अतीत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच समृद्धी जाधव यांनी उत्साहाने व मोठ्या आशेने जमलेल्या बालगोपाळांच्या समवेत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो सेशन केले यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा व पुतळा पाहिला आहे. पण थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज यांना जवळून पाहण्याचे भाग्य लाभले. असा चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. कराड तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असलेल्या उंब्रज या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जयवंत जाधव, महेश जाधव, राम ढवळे, अमोल पाटील, सरपंच महेश कालगावकर, योगीराज जाधव हे उपस्थित होते. त्यानंतर चरेगाव येथील जय हनुमान मंदिरात जाऊन श्री छ खा. उदयनराजे भोसले यांनी श्री हनुमानाच्या दर्शन घेतले. या वेळेला मोहनराव माने, भीमराव माने, ज्योतीराम माने, शरद सपकाळ, मंदार तोडकर, प्रवीण माने ,चंद्रहार माने उपस्थित होते. हनुमान वाडी या ठिकाणी महिलांनी औक्षण केल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने उदयनराजेंचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला दीपाली चव्हाण, वैशाली शिंदे, राजश्री धनवे, बाळासाहेब शिंदे तसेच अकरा वर्षाच्या अभिराज ज्ञानेश्‍वर पाटील या चिमुकल्याने शिवगर्जना करून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या या चिमुकल्या अभिजीतच्या शिव गर्जना अभिजीत कलेमुळे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
नवीन कवठे गावात सुद्धा मोहन चव्हाण, शिवाजी यादव, शिवाजी घाडगे, प्रभाकर सूर्यवंशी, गणेश घाडगे, नवनाथ यादव, बबन यादव, विशाल यादव यांनी श्री छ खा भोसले यांचा सत्कार केला. या वेळेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एकूणच या संपर्क दौऱ्यामध्ये कराड उत्तर परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. जय हनुमान करियर अकॅडमी, बेलवाडी या ठिकाणीही उदयनराजे भोसले यांनी भेट दिली आणि या करिअरच्या माध्यमातून युवा पिढी घडवण्याच्या कामाचं मनापासून कौतुक केले. याठिकाणी महेश गायकवाड, प्रमोद गायकवाड, संदीप गायकवाड यांनी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे यथोचत स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Adv