अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार उदयनराजे

55
Adv

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आता मराठा आरक्षणाच्या प्रलंबनासाठी राज्यातील ज्येष्ठ नेते जबाबदार असल्याचा आरोप केलाआहे. तसेच अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात असा सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

“मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत नाही, तर शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवर आधारित समाजाच्या भूमिकेतून बोलत आहे. आपल्या आधीची जी पिढी राजकारणात आहे त्यांना मला प्रश्न वाचारायचा आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित का ठेवला? हा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला आहे. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहे. आपली पुढची पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा शरमेने मान खाली घालावी लागेल. या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं कारण आजही तेच सत्तेत आहेत.” असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले.

शरद पवार यांचे नाव न घेता सूचकपणे टीका करताना उदयनराजे म्हणाले, विश्वासघात झाला तर लोक तुम्हाला खाली खेचतील. तुमची इच्छा असेल तर हो म्हणा नाही तर लोक तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. क्रियेला प्रतिक्रिया झाली तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. आता करोनाचा काळ आहे म्हणून लोक घरात आहेत. जातीचं राजकारण कधीपर्यंत करणार समस्यांवर राजकारण करणार आहात की नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आऱक्षणासाठी काम केलं तरीही आपण त्यांनाच नावं ठेवतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर ते पुढं न्यावं, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांनी पाठराखण केली. दरम्यान, मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही? असा सवालही त्यांनी केला.

Adv