सातारा जिल्ह्यात ७ कोटीची विकास कामे मंजूर

270
Adv

सातारा जिल्हयातील विविध तालुक्यातील गावांमध्ये जिल्हा नियोजन समितीमधुन आम्ही सुचविलेल्या कामांपैकी खालील कामांना एकूण ७ कोटी ५१ लक्ष निधी मंजूर करण्यात आला असुन सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सातारा तालुक्यातील खोडद येथे अंतर्गत रस्ते काँन्क्रिटीकरण करणे, वनगळ येथे स्मशानभुमीकडेजाणारा रस्ता, चाळकेवाडी, चिंचणेर वंदन येथील फडतरे वस्ती,मांडवे, मस्करवाडी, सोनापूर, आकले, संभाजीनगर येथील अंतर्गत रस्ते,जिहेयेथील मुख्य रस्त्यापासून श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत काँक्रिटीकरण, चिखली येथील स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता,नागठाणे येथील हिराई गोल्डन सिटीमध्ये अंतर्गंत खडीकरण व डांबरीकरणकरणे, रायघर येथे स्मशानभुमीशेड बांधणे,कामेरी येथे स्मशानभुमी संरक्षण भिंतबांधणे.साबळेवाडी येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटी करण करणे, पाटखळ स्वामीनगर येथील रस्ता मुरमीकरण व
खडीकरण करणे.जावली तालुक्यातील वरोशी गांवठाण अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे,मामुर्डी अंतर्गत रस्ते काँक्रिटी करण करणे.महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे आवळण येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे,गुरेघर वेताळमंदिर ते विठ्ठल मंदिरा पर्यंत रस्ता खडीकरण-डांबरीकरण करणे,खांबील चोरगे येथे स्मशानभुमी शेड बैठक व्यवस्था करणे.लाखवड येथीलगणेशवाडी येथे अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे.गोगवे येथील स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे.

खंडाळा तोंडल अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, भादे ताटे वस्ती येथील रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, गोगवे येथील स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे,लाखवड येथे अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे.वाई तालुक्यातील बावधन येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे,कोरेगांव तालुक्यातील तडवळे येथे आरसीसी गटर बांधकाम करणे, बर्गेवाडी येथील गणेशतळ ते सातारा रोड खेड रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. पाटण तालुकयातील नावडी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.कराड तालुक्यातील सैदापूर, मसूर, येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, सैदापूर येथे प्रकाशनंद
कॉलनीमधील रस्ता काँक्रिटीकरण आणि मसूर खडकपेठ येथील मोहल्ला ते संजय शिंतोंडे यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे,इत्यादी कामांचा समावेश आहे.तसेच कोल्हापूर पध्दतीचे साठवण बंधारे बांधणे या शिर्षकाखाली खंडाळा तालुक्यातील येथे पाडळी (बोरकर वस्ती) पाझर तलाव दुरुस्ती करणे, सातारा तालुक्यातील मौजे साबळेवाडी येथे साठवण बंधारा बांधणे,बोरखळ येथे साठवण बंधारा बांधणे,जांभे सवळगीचा ओढा येथे साठवण बंधारा बांधणे.काळोशी येथे साठवण बंधारा बांधणे,कराड तालुक्यातील मौजे गायकवाडवाडी येथे साठवण बंधारा बांधणे.

खंडाळा तालुक्यातील इजिमा-9 ते पारगांव जवळे कर्नवडी रस्ता,कोरेगांव तालुक्यातील जायगांव कण्हेरखेड वेलंग निगडी दुधी कठापूर रस्ता सा.क्र4/00 ते 5/00, जायगांवकण्हेरखेड वेलंग निगडी दुधी कठापूर रस्ता सा.क्र3/00 ते 4/00खटाव तालुक्यातील वर्धनगड पवारवाडी जोड रस्ता सातारातालुक्यातील सोनगांव तर्फ सातारा जोड रस्ता,कराड तालुक्यातील पाल हरपळवाडी अतित निसराळे कामेरी रस्ता,अंगणवाडी इमारत बांधकाम सातारा तालुक्यातील सारखळ,किडगांव पाटखळमाथा, मर्ढे,वेचले,देवकल,जावली तालुक्यातील सोमर्डी, कोरेगांव तालुक्यातील आर्वी, प्राथमिक शाळा इमारत बांधकाम सातारा तालुक्यातील स्वामीनगर, सांबरवाडी, कोरेगांव तालुक्यातील
अरबवाडी, महाबळेश्वर तालुक्यातील पिंपरी तांब.प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती सातारा तालुक्यातील जाधववाडी, पाटखळ, बसाप्पाचीवाडी,मालगांव,वाढे,वासोळे, महाबळेश्वर तालुक्यातील तायघाट,पाटण तालुक्यातील खडकवाडी,चिचेंवाडी, दुसाळे,सडादुसाळे.त्यासाठी एकूण ७ कोटीं ५१ लक्ष निधी जिल्हा नियोजन समितीमधुन उपलब्ध करुन घेण्यात आलेले आहेत.सदरची कामे जिल्हापरिषदेच्या माध्यमातून राबविलीजाणार आहेत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Adv