म्हसवड वाई रहिमतपूर फलटण पालिकेवर भाजप नगराध्यक्ष पदाचा झेंडा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यशस्वी झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष कौतुक केले
वाई नगरपरिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी करून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सत्तेला सुरुंग लावाला सुरुंग लावण्याची पेरणी ही गेल्या सहा महिन्या पासून नामदार गोरे यांनी वाई शहरासह तालुक्यात केली होती
इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सत्तेलाही रहिमतपूर पालिकेत जयाभाऊंनी आपला करिष्मा दाखवत नगराध्यक्ष विराजमान करून सुरुंग लावला
फलटण येथेही मुख्यमंत्रीची सभा घेऊन माजी खासदार नाईक निंबाळकर यांचा झालेला पराभवाचा एक प्रकारे वाचपाच काढत फलटण पालिकेतही भाजपचा नगराध्यक्ष केला
म्हसवड मध्ये जवळपास अजितदादांचा उमेदवार विजयी होणार हे त्रिवार सत्य होते आपली चाणक्य नीती दाखवत आमदार गोरे यांनी होम ग्राउंड वर ही भाजपचा नगराध्यक्ष करत इतिहास रचला त्यामुळे जिल्ह्यात भाजपचा नगराध्यक्ष करण्यात मंत्री जयाभाऊ किंगमेकर ठरले असल्याचे दिसून येते






