भाजपच्या जिल्ह्यात नाही भाजपलावाली

440
Adv

सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा सध्याच्या परिस्थितीला लोकसभा खासदार सहित चार विधानसभा सदस्य हे भाजपचे एवढे वर्चस्व असताना भाजपचा पालकमंत्री होऊ शकत नाही यापेक्षा दुर्दैव तरी काय अशी चौका चौकात चर्चा सर्वसामान्य नागरिक करत आहे

विद्यमान दोन मंत्री सातारा जिल्ह्यात असून त्या दोन्ही मंत्री महोदयांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कार्यशाळा घेऊन पक्ष कसा चालवायचा याचा धडा देण्याची गरज असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे यांच्यावर वेळ तर आली नाही ना असे भाजपचेच काही कार्यकर्ते व पदाधिकारी म्हणत आहेत

शिर्डी येथे भाजप पक्षा कसा वाढवावा व पक्षाची ध्येय धोरणे काय असतात शिबिर गेल्या आठवड्यातच झाले मात्र याचा तीळ मात्र परिणाम मात्र जिल्हाध्यक्ष न शहीद भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही नक्की हे जिल्हाध्यक्ष शिबिरासाठी गेले होते की दर्शनासाठी गेले होते हे शोधण्याचे गरज आहे

भाजपच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच लोकसभेला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपाने खासदार मिळाले त्यानंतर विधानसभेतही तोच करिष्मा पाहायला मिळाला पहिल्यांदाच चार आमदार भाजपचे निवडून आले मंत्रिमंडळ विस्तारात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सारखे महत्त्वाचे खाते दिले गेले दुसरे आमदार जयकुमार गोरे यांनाही महत्वाचे ग्रामविकास खाते देऊन भाजपने सन्मान केला मात्र पालकमंत्री पदाच्या बाबतीत अन्याय झाला असल्याची भावना कालपासून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे

सातारा जिल्ह्याचे दुर्दैव असे की काँग्रेस विचारी असलेले विद्यमान सध्याचे भाजप जिल्हाध्यक्ष व त्यांच्या टीमला भाजपचा पालकमंत्री सातारा जिल्ह्यात व्हावा असे वाटत नसल्याचे आत्तापर्यंत दिसते ज्यांचे विचार मूळ कॉंग्रेसचे असतील त्यांना भाजपचे सोयर सुतक तरी कशाला पडेल असे त्यांच्या कृतीतून दिसते

एवढे सर्व विद्यमान लोकप्रतिनिधी भाजपने महाराष्ट्रासह देशाला दिले त्या भाजपच्या पक्षात एकाही भाजप पदाधिकाऱ्याला आपल्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा म्हणून जाहीर कुठेही वाच्यता सध्याच्या चालू घडीला तरी गेली नसल्याचे दिसून येते

भाजपच्या राज्यातील मंत्रांच्या मागे उभे राहून आपणच शाडो मंत्री असल्याची अभिर भाव हे जिल्हाध्यक्ष मारत आहेत स्वतःच्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री झाला नाही तो होण्यासाठी निदान आवाज उठवला असता तरी आपण जिल्हाध्यक्ष पदावर बसला याचे सार्थक झाले असते असंच म्हणावे लागेल

सर्वसामान्य कार्यकर्त्यांपरपणे राहणारा जिल्हाध्यक्ष मिळणार कधी
आपणच राज्यातील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या बरोबर शाडो मंत्री असल्यासारखे वागून मंत्रिमंडळ विस्तार असो मंत्रालय असो जिल्हा असो या ठिकाणी आपली छबी ही प्रत्येक ठिकाणी कॅमेरात कैद झाली आहे स्वतः मंत्री महोदयांच्या रूपात शाडो मंत्री म्हणून वावरणाऱ्या जिल्हाध्यक्ष भाजपला मिळाले हे दुर्दैवीच म्हणावे लागेल

Adv