जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांचे खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी केले स्वागत

41
Adv

भाजपचे साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख अजय बनसल यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले

ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य लाभले याचे मला समाधान आहे, अशा शब्दात नूतन जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी आपली भावना खासदार श्रीमंत छ उदयनराजे भोसले यांच्याकडे व्यक्त केली असून जिल्हा वासियांच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले

यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर ,युवा नेते काका धुमाळ जितेंद्रसिंह खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. क्रांतिकारी व ऐतिहासिक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवतानाच सुशासन आणि लोकाभिमुख कामकाज करु आणि जनतेच्या अपेक्षा सार्थ ठरवू, असे आश्‍वासन जिल्हा पोलीस प्रमुख बन्सल यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना यावेळी दिले.

Adv