अजित पवार यांनी ‘खंजीर खुपसण्याचा’ धडा शरद पवार यांच्याकडून घेतला का?

57
Adv

काहीशी अशीच घटना महाराष्ट्रात 1978 साली घडली होती. 1978 साली शरद पवार यांनी वसंतदादा पाटलांच्या सरकारमधून बाहेर पडत पुरोगामी लोकशाही दलाचं म्हणजेच पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं. शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका पुढे अनेक वर्षं होत राहिली.
आताही अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या घटनेची आठवण काढली जातेय, कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं की, “अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे”.

पुरोगामी लोकशाही दल किंवा पुलोदची स्थापना करून शरद पवारांनी राज्यातलं पहिलं आघाडी सरकार स्थापन केलं होतं. वयाच्या 38 व्या वर्षी ते मुख्यमंत्री बनले. नाट्यमय घडामोडीनंतर ते मुख्यमंत्री झाले.शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांच्यावर त्यावेळी झाली होती. काही जणांच्या मते शरद पवारांनी अगदी तरुण वयात सरकार स्थापन करून आपल्या राजकीय चातुर्याची ओळख राज्याला करून दिली. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री कसे बनले हे आज आपण पाहू.
शरद पवारांना पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवणाऱ्या ‘पुलोद’च्या प्रयोगाची बिजं आणीबाणी, 1977 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या राजकीय अस्थिरतेत सापडतात.
12 जून 1975 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींविरोधात निर्णय दिला. 1971 च्या निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याप्रकरणी इंदिरा गांधी दोषी ठरल्या होत्या. ती निवडणूक रद्द करण्यासोबतच इंदिरा गांधींना पुढील सहा वर्षं निवडणूक लढवण्यावरही बंदी घालण्यात आली.

महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ‘महाविकासआघाडी’च्या बैठकांवर बैठका सुरू असताना आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर सहमतीचे संकेत दिसत असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणानं वळण घेतलंय. शनिवारी 23 नोव्हेंबर सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.भाजपसोबत जाण्याचा निर्णय अजित पवारांचा वैयक्तिक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ट्विटरवरून सांगितलं, मात्र भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा भाजपला पाठिंबा असून तसं पत्रही राज्यपालांना दिलंय.

Adv