आयुक्त वळवी साताऱ्यात हजर, अपर जिल्हाधिकारी मात्र मुंबईला

393
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी कागदपत्रांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी हजर झाले .त्यांच्याबरोबर अनिल वसावे व पियुष बोंगिरवार हे सुद्धा असे पत्नीक हजर झाले होते मात्र महसूल विभागाच्या तातडीच्या बैठकीमुळे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे मुंबईला गेले त्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही पुढील सुनावणी अकरा जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याचे झाडांनी प्रकरणातील मूळ तक्रार सुशांत मोरे यांनी सांगितले

झाडाणी तालुका महाबळेश्वर येथे सहाशे चाळीस एकर जमिनीच्या खरेदीचे प्रकरण प्रचंड गाजत आहे याप्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना दिले होते .गलांडे यांनी वळवी यांच्या वकिलाचे वकील पत्र रद्द करून 3 जुलै रोजी आठ जणांना हजर राहण्याची नोटीस बजावली होती त्यानुसार गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी त्यांच्या पत्नी, पियुष बोंगिरवार व अनिल वसावे सपत्नीक सुनावणीसाठी हजर झाले होते .

मात्र महसूल विभागाच्या तातडीच्या बैठकीसाठी जीवन गलांडे यांना मुंबईला जावे लागले त्यामुळे ही सुनावणी आज होऊ शकली नाही यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाचे अवलकार कोण जयवंत वीर यांनी संबंधित यांना सुनावणीची पुढील तारीख 11 जुलै असून सुनावणी अकरा वाजता होणार आहे त्यावेळी उपस्थित राहण्याचे सूचना केली .मूळ तक्रारदार सुशांत मोरे या वेळी उपस्थित होते .

Adv