सातारा शहर पोलीस स्टेशन ते स्टँडकडे जाणार्या रस्त्याच्या लगतच असणारे चिकन सेंटर चे अतिक्रमण अर्धवट काढले असून संबंधित मालकाने स्टे आणल्याचे भाग निरीक्षक यांनी सांगितले असून निरीक्षक यांच्याकडे संबंधित स्टे ची प्रत मागितली असता दोन दिवसात देतो असे सांगून टाळाटाळ केली असल्याचे दिसून येते
पालिकेचा अतिक्रमण विभाग कोणाची भीड भाड न बाळगता कोणाच्या दबावाखाली बळी न पडता अतिक्रमण काढत होता मात्र संबंधित विभागाचे विभाग निरीक्षक यांनी का माघार घेतली हा खरा प्रश्न व राहिला आहे अर्धवट पाडलेले अतिक्रमण पूर्ण का पाडले नाही संबंधित विभाग निरीक्षक स्टे ची कॉपी का देत नाहीत का कुठे दर्शन लक्ष्मीचे घेतले ही चर्चा पालिकेत ऐकण्यास मिळते असेल तर कुंपणच शेत खात असल्याचे दिसून येते
पालिकेचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष घालणार का का कानाडोळा करणार असे असेल तर पालिकेलाही अतिक्रमणाचा वेढा बसायला वेळ लागणार नाही । यावरून पालिकेचा अतिक्रमण विभाग बरखास्त केला तर वावगे ठरणार नाही अतिक्रमण विभाग वाले तरी कशाला वाईटपणा घेतील त्यामुळे हा विभागात बरखास्तच करा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे