कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आमदार महेश शिंदे यांनी०.१५ टीएमसी पाणी अरबवाडी तलावात सोडण्याचे काम मंजूर करून घेतले. या त्यांच्या कामगिरीमुळे अरबवाडी ,दुधनवाडी, बनवडी ,खामकरवाडी, अंबवडे , संमत वाघोली, पळशी आदी गावातील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात या कामाचे भूमिपूजन होईल. अशी माहिती आ. महेश शिंदे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कोरेगाव तालुक्यातील विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप साहेब यांचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान वाटत आहे असे स्पष्ट करून आ. शिंदे यांनी सांगितले की ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केल्यामुळे अरबवाडी तलावाला पाणी सोडण्यात येणार आहे. मागील लोकप्रतिनिधीची इच्छाशक्ती व अभ्यास कमी पडत होता.त्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्न हा स्थानिक भूमिपुत्र सोडवतो.हे सिद्ध झालेले आहे.प्रश्न समजून घेण्यासाठी भूमिपुत्र असावा लागतो.याचे त्यांनी पुनर्विचार केला.आ.शशिकांत शिंदे आजही त्यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे.कायद्यानेच काम होत असल्याचेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला आठवण करून दिली.
या पत्रकार परिषदेला कोरेगाव तालुक्यातील ग्रामस्थ तानाजी गोळे, मनोज गाढवे, हनुमंत नलगे, पोपट दिघे, दीपक काशीद, व युवा नेते राहुल बर्गे निलेश नलवडे उपस्थित होते







