यंदाही आग्रा येथे शिवजयंती महोत्सवचे आयोजन

870
Adv

आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आम मध्ये छत्रपती शिवरायांची
शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वा जयंती सोहळामोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.या सोहळ्यात प्रत्यक्ष आणि डिजिटल माध्यमांतून २ कोटी शिवभक्त सहभागी होतील.छशिवरायांची शौर्यगाथा देश आणि जगाला सांगण्याचा आणि दाखवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे अशी माहिती विनोद पाटील यांनी देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने यंदा पुन्हा आग्रा येथे साजरा होणाऱ्या शिवजयंती महोत्सवा संदर्भात दिली.

देशाच्या इतिहासात आग्रा येथील लाल किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे.औरंगजेबासारख्या कपटी आणि कारस्थानी बादशहाने छत्रपतींना कैद करण्याचा डाव याच किल्ल्यात रचला आणि महाराजांना नजरकैदेत ठेवले.परंतु गनिमी काव्याचा अवलंब
करत औरंगजेबाच्या हातावर तुरी देत सुखरूप महाराष्ट्रात येण्याचा भीमपराक्रम केला,तो याच ठिकाणी पावसाळ्यात
मराठ्यांच्या घोड्यांना बाहेर जागा मिळेना,म्हणून इथल्याच ताजमहालात महादजी शिंदेंनी मराठ्यांची घोडी बांधली तेही याच आग्र्ग्यात.हाच दैदिप्यमान इतिहास आपल्याला आग्रायेथून पुन्हा एकदा जागवायचा असल्याचे पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे..अनेक मान्यवर राहणार उपस्थित
पुरातत्व खात्याने या सोहळ्याला परवानगीनाकारली होती, त्या विरोधात विनोद पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर आपल्या बाजूने निकाल घेतला.राज्यसरकार सहआयोजक असल्याने आग्राकिल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल,असा निकाल आपणकोर्टाकडून मिळवला. विनोद पाटील यांनीविनंती केल्यानंतर राज्य सरकार देखीलसहआयोजकपद स्वीकारण्यास तयारझाले.आता यंदाही शिवजयंतीचा कार्यक्रम आग्र्यात धुमधडाक्यात साजरा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी,विशेष अतिथी छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Adv