श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांचे पालखी आता जवळपास पंढरपूरच्या सीमेवरील पोहोचलेल्या असून यंदाच्या वर्षी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नामदार जयकुमार गोरे यांनी केल्या उत्कृष्ट नियोजनाने महाराष्ट्रातील वारकरी सुखावले
राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना कुठलीही अडचणी येऊ नये म्हणून स्वतः गेल्या दोन महिन्यांपासून आपर कष्ट केले वारीच्या मार्गावर ठिकठिकाणी जर्मन पद्धतीचे मंडप,पंढरपूरची स्वच्छता, वारकऱ्यांसाठी चालून आल्यानंतर आरोग्य सेवा, ठिकठिकाणी पाण्याची सोय, मोबाईल चार्जर ची सोय ,तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ पंढरपूर करण्याचा मानस त्यांनी सुरू केला होता त्याला यशही मिळाल्याने वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या रूपे नामदार जयकुमार गोरे यांनाआशीर्वाद दिले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे
वारी सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत प्रत्येक ठिकाणी जवळजवळ नामदार जयकुमार गोरे यांनी स्वतः भेट देऊन सर्व गोष्टीची पाहणी केली त्यामुळे वारकरी व महाराष्ट्रातील लोकांच्या बाबतीत आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोन एक कार्यक्षम मंत्री म्हणून आज त्यांची ओळख निर्माण झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या विश्वासाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांच्याकडे दिले त्याला ते पात्र ठरले असल्याचे चित्र बघायला मिळाले
नामदार जयकुमार गोरे यांनी वारकऱ्यांसोबत हात मिळवणी करून विचारपूस केली तंबूत जाऊन पालखी सोहळ्यातील पालखीच्या मानकऱ्यांना भेटत काही अडचण आहे का म्हणून ही विचारपूस त्यांना करताना पाहिले महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्वतः उपस्थित राहून जातीने लक्ष देणारे मंत्री म्हणून ही आज जया भाऊंकडे पाहिले जात आहे