छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद मध्य प्रदेशात आता चांगलाच पेटला आहे आणि त्याचे लोणं आता महाराष्ट्रातही येतील अशी चिन्ह आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर भाजप नेते श्री छ उदयनराजे भोसले यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत,’ असेही ते म्हणाले.
संपूर्ण देशाचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील स्मारक JCB ने काढण्यात आले. ज्याप्रकारे स्मारक हलवण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे. त्या कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी हजारो शिवप्रेमींनी महाराजांचे स्मारक पुन्हा त्याच जागेवर उभे केल्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार मानतो!
असे टिवट श्री छ उदयनराजे भोसले यांच्या वतीने करण्यात आले आहे