श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे राजकीय वर्चस्व जैसे थेच

711
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे पक्षातील राजकीय वर्चस्व जैसे थे असल्याचेच मुंबई येथे आज पाहायला मिळाले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साप्ताहिक बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या लाईन मध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे बसले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व जैसे थे असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही जणांच्या पुंग्या टाईट होणार हे नक्की

देवगिरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साप्ताहिक बैठकीत पक्षाच्या सर्व आमदारांसोबत त्यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.आगामी काळात पक्ष वाढीसाठी राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांवर विचारमंथन करण्यात आले.

या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री मा. श्री.अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनील तटकरे, खासदार मान्यवर मंत्री, ज्येष्ठ नेते,पक्ष पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते

Adv