साधेपणाने साजरा होणार यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा छ संभाजीराजे

83
Adv

शिवराज्याभिषेक सोहळ्याला जाण्यासाठी मी गेल्या दोन महिन्यापासून स्वतःला कोरंटाईन केले आहे मोजक्या लोकांसह यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा होणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच दिली आहे

करोणाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा सर्व नियम व अटी पाळून होणार असून यावर्षी शिवभक्तांनी रायगडावर गर्दीत करू नका आपल्या घरातूनच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून घरातच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करा असे आवाहन ही छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे

शिवराज्याभिषेक सोहळा संदर्भात उद्या राज्य सरकारशी चर्चा होणार आहे सर्व शिवभक्तांना घरी बसून शिवराज्याभिषेक सोहळा कसा पाहता येईल याची सोय करणार असून प्रत्येक शिवभक्ताची जबाबदारी ही माझी जबाबदारी मी समजतो म्हणूनच खबरदारी म्हणून यंदाच्या वर्षीचा सोहळा सर्व शिवभक्तांनी घरातून साजरा करावा व टीव्हीवर पाहावा अशी इच्छाही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली

Adv