शाहूनगरीत रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार दिपक पवार

292
Adv

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सातारा जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त सहकार्याने तब्बल 61 वर्षानंतर साताऱ्यात महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगत असून या कुस्तीचा थरार मंगळवारपासून सातारकर कुस्ती शौकीनांना अनुभवता येणार आहे सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते साडेनऊ असा दोन सत्रांमध्ये तीन गांधीचे व दोन मातीचे अशा एकूण पाच आकड्यांमध्ये या कुस्त्या राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे समन्वयक ललित लांडगे व सातारा जिल्हा तालीम संघाचे निमंत्रक दिपक बापू पवार व समन्वयक सुधीर पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली

या महाराष्ट्र केसरीच्या यजमानपद आ बाबत बोलताना दीपक पवार म्हणाले या स्पर्धेचे साताऱ्याला यजमान पद देण्याचे श्रेय हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांचे आहे गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा साताऱ्यात व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो यंदा तो मान साताऱ्याला मिळाला असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा तालीम संघ सातारा जिल्हा प्रशासन सातारा शहरातील विविध सामाजिक व दानशूर संस्था तसेच सातारकर अशी या सर्वांनी मिळून सहकार्य करावे असे आवाहन दीपक पवार यांनी केले तब्बल 61 वर्षांनी सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा दुर्मिळ मान मिळत आहे तालीम संघाने या स्पर्धेचे कल्पक नियोजन केले असून या संपूर्ण पाच दिवसांच्य कार्यक्रमाचा खर्च तब्बल तीन कोटी रुपये आहे सातारा शहरातील दानशूर संस्था तसेच जिल्हा तालीम संघाचे हितचिंतक व संचालक यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे या स्पर्धे संदर्भात बोलताना ललित लांडगे म्हणाले मंगळवारी दिनांक 15 रोजी सकाळी नऊ वाजता सर्व पंचांचे आगमन सकाळी साडे नऊ ते अकरा पंचांचा उजळणी वर्ग दुपारी बारा वाजेपर्यंत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण 45 संघांचे आगमन आणि त्यांची नोंदणी दुपारी 12 ते 2 कुस्तीगिरांचा ची वैद्यकीय तपासणी होणार आहे यामध्ये 57 किलो 70 किलो 92 किलो गटातील पैलवानांचा समावेश आहे सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत वरील तिन्ही वजनी गटातील महिलांच्या कुस्ती स्पर्धा दोन मातीचे तर तीन जागी आखाड्यावर होणार आहे पहिल्या सत्रातील कुस्ती स्पर्धा या सकाळी साडेसात ते साडेनऊ सकाळच्या सत्रात होणार आहेत 900 मल्ल 110 प्रशिक्षक पंच आणि साडेपाचशे पोलीस अशा सर्व लवाजमा ची भोजनाची सोय करण्यात आली असून सर्व पाहुण्यांची व्यवस्था सातारा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती शाहू स्टेडियम च्या संकुलामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर राज्याचे सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई या मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे दररोज पाच दिवस आला विविध वरती गटांमध्ये प्रत्येकी तीन अशा एकूण 18 कुस्त्या रंगणार असून त्यांचे प्राथमिक उपांत्य असे दोन फेऱ्या होणार आहेत छत्रपती शाहू क्रीडा संकुल आला तब्बल साडेपाचशे पोलिसांचा खडा पहारा असणार आहे त्यामुळे सातारा एसटी बस स्थानक ते हुतात्मा उद्यान चौक हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिनांक 5 ते 9 या वेळेमध्ये या मार्गावरील वाहतूक जुन्या आरटीओ कदम बागे मार्गे राष्ट्रवादी भवन ते पोवई नाका सेच सातार्‍यात येणाऱ्या एसटीने सुद्धा स्टेडियमच्या पिछाडी कडून सातारा आगारांमध्ये प्रवेश करावा लागणार आहे तसेच सर्व वाहनांची पार्किंग व्यवस्था शाहू स्टेडियम समोरील धंदेवाईक शिक्षण शाळा तसेच तेथील उपलब्ध पार्किंग स्थळांमध्ये करण्यात आली आहे दिनांक 8 व 9 एप्रिल रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य व अंतिम फेरीचे 70 92 आणि 125 किलो वजनी गटातील थरारक सामने रंगणार आहेत या सामन्यांना अधिकाधिक गर्दी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे स्टेडियम शमतात 55000 आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरारक सामना दिनांक 9 रोजी होत असून मानाची चांदीची गदा देण्याकरिता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व निघत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जातीने उपस्थित राहणार आहेत हा कुस्ती सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व सातारकरांनी संयोजकांना सहकार्य करावे असे आवाहन दीपक पवार आणि ललित लांडगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले या वेळी महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान अमोल बुचडे हेदेखील उपस्थित होते

Adv