सातारा पोलिसांच्या जिगरबाज तपासाला सातारकरांचा सलाम खा उदयनराजे भोसले

714
Adv

साताऱ्यात फिरस्त्या कुटुंबातील चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सातारा पोलिसांनी काल अटक केली. सर्वात पहिल्यांदा सातारा पोलिस यांनी या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कसोशीने तपास केला त्याबद्दल सातारा पोलिस दलातील सर्व कर्मचारी यांचे धन्यवाद व अभिनंदन.

अतिशय निंदनिय व घृणास्पद अश्या झालेल्या या घटनेचा आम्ही निषेध करतो.फिरस्ते कुटुंबियांसाठी व त्यांच्या संपूर्ण समाजासाठी आम्हाला पहिल्यापासून संवेदना आहेत. याच अनुषंगाने त्यांच्या मागण्या, त्यांची कामे तसेच त्यांच्या घरांसाठी आम्ही वेळोवेळी वैयक्तिकरित्या मदती केल्या आहेत तसेच अनेक वेळा शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे परंतु दुर्देवाने आजपर्यंत कोणत्याच सरकारने, शासनाने यांना गांभीर्याने घेतलेले नाही.

आज जी घटना सातारा मध्ये झाली अशा प्रकारच्या घटना संपूर्ण राज्यभरात अनेक वेळा घडल्या आहेत, प्रत्येक वेळी न्याय मागण्यासाठी या समाजाला संघर्ष करावा लागतो. हा समाज दाद मागणार तरी कोणाकडे ? यांची दखल घेणार कोण ? हा मोठा प्रश्न आहे.

अश्या घटना घडल्या नंतर त्यांची कोणत्याही प्रकारची दाद घेतली जात नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक गुन्ह्यात न्याय मागण्यांसाठी वकिलाची नियुक्ती पण करू शकत नाहीत त्यामुळे अनेक वेळा न्याय मिळत नाही. आजपर्यंत या समाजाला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देने, मारहाण करणे, खोट्या गुन्ह्यात अडकवणे हे सर्रासपणे होत आहे. हे सर्व थांबणार कुठे यांच्या बाबतीत सरकार ला जाग कधी येणार असा प्रश्न पडतो.

आम्ही पहिल्यापासून या समाजासाठी शासनाकडे महत्वाच्या व प्राथमिक मागण्या केल्या आहेत प्रामुख्याने त्या मध्ये,त्यांना रहायला स्वतःचे घर असावे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था असावी, त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी शासनाने विविध योजना आदिवासी विकास महामंडळाच्या धर्तीवर राबवाव्यात जेणे करून या समाजाची उन्नती होऊन हा समाज मुख्य प्रवाहात येईल.

परंतु शासन स्तरावर यापैकी कोणत्याच गोष्टी होणार नसतील तर अशा घटनांना रोखणे अवघड होईल. तरीही व्यक्तिशः आम्ही या पीड़िता ला न्याय मिळावा आणि आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हणुन फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ह्या केस संदर्भात कामकाज चालवावे या साठी योग्य त्या यंत्रणेच्या संपर्कात आहोत आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास असून पीड़ितेला नक्की न्याय मिळेल अशी खात्री आहे.

तसेच या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू.

Adv