सात-बारा होणारा अधिक सोपा रामदास जगताप

81
Adv

सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने समजण्यास किचकट ठरलेला जमिनीचा सातबारा उतारा सुट सुट्टीत करण्याचे भुमिअभिलेख विभागाने ठरवले आहे या प्रस्तावावर निर्णय होऊन जून अखेरीला त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे याचा फायदा शेतकरी तसेच जमीन खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना होणार असल्याची माहिती ई-महाभूमी चे समन्वयक व तत्कालीन साताऱ्याचे प्रांताधिकारी रामदास जगताप यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

अतिशय किचकट असेला ला सातबारा उतारा़ उच्चशिक्षिताना ही वाचण्यास अत्यंत अवघड जातो सर्वांनाच सातबारा समजावा त्यामधील बारकावे कळावेत या उद्देशाने तो अधिक सुटसुटीत करण्याचे ठरले त्यासाठी त्यात काही बदल करण्यात येतील भूमिअभिलेख विभागाने पुढाकार घेत तयार केलेला प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवला असून तो लवकर मंजूर होईल अशी आशा ही रामदास जगताप यांनी यावेळी व्यक्त केली

काय आहेत बदल

पीक लागवड लाभ क्षेत्र पोटखराब क्षेत्र हे सध्याच्या सातबारा मध्ये दाखवलेले आहेत आता त्यासोबतच सातबारावर एकूण क्षेत्र दाखविण्यात येणार आहे खातेदारांचा खाते क्रमांक पूर्वी इतर हक्कात कंसात दर्शवला जात होता तो आता खातेदारांच्या नावापूर्वीच दाखविण्यात येईल यामुळे कोणत्या खातेदाराचा कोणता क्रमांक आहे हे समजणे सोपे जाणार आहे सध्याच्या सातबारामध्ये मयत व्यक्ती अथवा ज्या व्यक्तीने जमिनीची विक्री केली आहे त्याचे नाव कंसात दाखविले जात होती नवीन सातबारा मध्येही ती नावे कंसात दाखविण्यात येणार आहेत मात्र ती खोडण्यात आलेली असतील खातेदाराच्या नावे असलेल्या कर्जाची रक्कम ते कर्ज बोजे कमी झाली आहेत का ते समजणे देखील नव्या उतारया मुळे शक्य होणार असल्याची माहिती ई भूमीचे समन्वयक रामदास जगताप यांनी सांगितले

Adv