श्री छ उदयनराजे भोसले यांनी दाखल केला राज्यसभेचा अर्ज

123
Adv

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विधान भवनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजेंना राज्यसभेवर घेण्याबाबत भाजपकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. मार्चमध्ये राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. या जागांवर भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपा ने महाराष्ट्र च्या नागरिकांची मने जिंकली आहेत

अर्ज दाखल करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपनगराध्यक्ष किशोर शिंदे माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर कोरेगाव चे युवा नेते नितीन भोसले माजी नगरसेवक संजय शिंदे नगरसेवक मनोज शेंडे , माजी नगरसेवक बबलू साळुंखे युवा नेते बाळासाहेब चोरगे काका धुमाळ, अॅड शैलेश चव्हाण संग्राम बर्गे अशोक घोरपडे गणेश जाधव सुनील बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते

Adv