उद्या फलटणमध्ये सभांचा धडाका

35
Adv

फलटण नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून उद्या भाजप उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची सभा तर संध्याकाळी शिवसेनेचे उमेदवार यांच्यासाठी गुलाबराव पाटील योगेश कदम निलेश सर आणि यांची फलटणमध्ये तोफ धडाडणार आहे

फलटणचा आमदार हा राष्ट्रवादीचा असून या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ही उमेदवार उभे असून एकही मंत्री याकडे फिरकला नसल्याने राष्ट्रवादीची ताकद शून्य असल्याचे दिसून येते

फलटण नगरपालिकेची निवडणूक टप्प्यात आता रंगत येऊ लागली आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात शीतयुद्ध रगले असले तरी उद्या भाजप उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष लागले असून शिवसेनेच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे मंत्री काय बोलणार याकडेही लक्ष लागले आहे

महायुती मधील पक्षच आमने-सामने असल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या सभांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Adv